महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी काही दिवसांचीच मुदत आहे. त्यामुळे या नंबरप्लेटसाठी वाहनधारकांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेकदा आपण राहतो एका शहरात आणि आपले वाहन हे आपल्या गावी किंवा दुसऱ्या शहरात रजिस्टर असते.
त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी रजिस्ट्रेशन असलेल्या शहरात जावे लागणार होते. मात्र, हा त्रास वाचावा म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे वाहनधारक पुणे शहरातील नोंदणी केंद्र निवडू शकतात.
देशातील वाहन कंपन्यांना २०१९ पासून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट देणे अनिवार्य केले आहे. मात्र, ज्यांनी २०१९ पूर्वी वाहन खरेदी केल्या आहेत त्यांनादेखील ही नंबरप्लेट बसवण अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर एचएआरपी प्लेट बसवू शकतात.
पुण्यात २५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत एक लाख ४२ हजार वाहनांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ३२ हजार वाहनांना या नंबरप्लेट बसवल्यादेखील आहेत.
पुण्यात जवळपास २५ लाख वाहनांना या नंबर प्लेट बसवायच्या आहेत. पुण्यात ही नंबर प्लेट बसवण्यासाठी १२५ केंद्रे आहेत. परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामासाठी वेळ जात आहे.
सध्या दिवसाला पाच-सहा हजार वाहनांची नोंदणी केली जात आहे. एक ते दीड हजार वाहनांच्या नंबर प्लेट लावल्या आहेत.त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी अजून दोन वर्षे लागू शकतो.