महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ मार्च ।। कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल सुरु होण्याआधी मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज उमरान मलिक दुखापतग्रस्त झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. उमरान मलिकला केकेआरने ७५ लाख रुपयांना खरेदी केलं होतं. उमरान याआधी सनरायजर्स हैदराबाद संघाचा भाग होता.
हैदराबादने उमरानला रिटेन केलं नव्हतं. यानंतर मलिक ऑक्शन पूलवर पोहोचला होता. केकेआरने उमरान मलिकच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची घोषणा केली. त्यानंतर उमरानच्या जागी चेतन सकारियाला स्थान देण्यात आलं. चेतन सकारिया भारतासाठी दोन टी२० सामने खेळला आहे. या व्यतिरिक्त १९ आयपीएल सामन्यात २० गडी बाद केले आहेत.
उमरान मलिकने केकेआर संघात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. उमरान म्हणाला होता की, ‘मी केकेआर संघासाठी खेळण्यास उत्सुक आहे. मी केकेआरची जर्सी घालण्यास आतूर आहे. मी आता जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. केकेआर डिफेडिंग चॅम्पियन्स आहे. या वर्षी चषक जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
उमरान हैदराबादसाठी खेळताना भरपूर चर्चेत राहिला. उमरान मलिकने सामन्यात १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली आहे. यामुळे उमरानला भारतासाठी टी२० मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. उमरानने यंदा केकेआरकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. केकेआरसाठी चांगली कामगिरी करून टीम इंडियात कमबॅक करणार असल्याचा त्याचा प्लान होता.
आयपीएल कधी सुरु होणार?
आयपीएल स्पर्धेत केकेआरचा पहिला सामना २२ मार्च रोजी असणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी दरम्यान ईडन गार्डनवर होणार आहे. केकेआरने ड्वेन ब्रावोला मेंटर बनवलं आहे. तर ओटिस गिब्सनला सहाय्यक कोच बनवलं आहे. आयपीएल स्पर्धेचा १८ वा सीझन आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ईडन गार्डनवर खेळण्यात येणार आहे.