महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ मार्च ।। सूर्य तळपत असल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज (ता. १७) विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा, तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात चंद्रपूर पाठोपाठ अकोला आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तसेच ब्रह्मपुरी, अमरावती, सोलापूर, नागपूर, मालेगाव, गडचिरोली येथे कमाल तापमान चाळीशीपार होते.