रुपयाचे चिन्ह बदलणे हेच आमचे भाषा धोरण, एम के स्टॅलिन यांचे अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ मार्च ।। 2025-26 च्या अर्थसंकल्पासाठी तामीळनाडू राज्याने रुपयाच्या चिन्हाच्या जागी रूबल हे तमिळ चिन्ह वापरले. अशाप्रकारे रुपयाचे चिन्ह बदलणे हीच आमची भाषा धोरणाप्रति दृढता आहे, अशा शब्दांत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तमिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह बदलल्यानंतर सीतारामन यांनी ही तर घातक मानसिकता असून फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे अशी प्रतिक्रीया दिली होती.

आम्ही अर्थसंकल्पासाठी तमिळ भाषेतील नवा लोगो प्रकाशित केला. हा लोगो त्यांना आवडला नसेल तर ती मोठी बातमी आहे. आम्ही केंद्र सरकारला 100 दिवसांच्या रोजगार योजनेसाठी म्हणजेच मनरेगासाठी निधीची मागणी केली, आपत्कालीन व्यवस्थापन, शाळेसाठी निधी देण्याची विनंती केली. परंतु, अर्थमंत्र्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यावर त्या का काहीच बोलत नाहीत, असा सवालही स्टॅलिन यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *