महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २० मार्च ।। केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम जुन्या नियमांपेक्षा सोपे असणार आहे. हे नियम विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षण करण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत.या नवीन नियमांनुसेर महिला फॅमिली पेन्शनसाठी दावा करु शकतात.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. यानुसार घटस्फोटित महिला या आपल्या दिवंगत वडिलांच्या पेन्शनवर दावा करु शकतात. यासाठी कोणत्याही कायदेशीर निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. याचसोबत महिला पेन्शर्स आता पतीऐवजी मुलांची नावे नॉमिनी म्हणून लावू शकतात.
पेन्शनच्या नियमांमध्ये बदल (Pension Rule Change)
घटस्फोटित किंवा वेगळी राहणारी मुलगी
जर मुलीचा घटस्फोट झाला असेल तर वडिलांच्या मृत्यूनंतर ती पेन्शनसाठी दावा करु शकते. जर वडिलांच्या हयातच मुलीच्या घस्फोटाची प्रक्रिया सुरु असेल तरीही ती यासाठी पात्र आहे.
महिला पेन्शनर्स
महिला पेन्शनर्स आता आपल्या मुलांना नॉमिनी बनवू शकतात. जर महिलेने कोणतीही हिंसाचाराची किंवा हुंडा अशासंबंधित खटला दाखल केला तर त्या मुलांना पेन्शनसाठी प्राथमिक दावेदार बनवू शकतात.
जर कोणत्याही विधवा महिलेने दुसरे लग्न केले तर तिला तिच्या आधीच्या पतीची पेन्शन मिळत राहणार आहे.
महिलांसाठी नियम
पेन्शन व्यतिरिक्त महिलांना अनेक सुविधादेखील दिल्या जातात.
बालसंगोपनासाठी रजा
सिंगल मदरला दोन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने रजा मिळते. ज्यामुळे मुलांना परदेशात प्रवास करण्याचीही परवानगी असते.
मातृत्व लाभ
याचसोबत गर्भपात झाल्यासदेखील भरपगारी रजा दिली जाईल.
याचसोबत सरकारी कार्यालयांमध्ये वसतिगृहे, पाळणाघरे अशा सुविधा दिल्या जातील.