महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी मुंबई न्यायालयात पोहोचले. या विभक्त जोडप्याच्या उपस्थितीने मीडियामध्ये खळबळ उडाली असताना, युझवेंद्रच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
युझवेंद्र चहलचा ‘बी युअर ओन शुगर डॅडी’ टी-शर्ट
युझवेंद्र चहल आणि धनश्री वेगवेगळे आले. यावेळी धनश्रीने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या जीन्स परिधान केले होते, तर युझवेंद्रने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम पँट घातली होती. परंतू त्याच्य टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधले कारण त्यावर “बी युअर ओन शुगर डॅडी. असे लिहिले होते.
त्याच्या टी-शर्टमुळे सोशल मीडिया नेटकऱ्यांना असे वाटू लागले आहे की ही धनश्रीवर अप्रत्यक्ष टीका आहे. घटस्फोट घेताना कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार धनश्रीला युझवेंद्रकडून ४.७५ कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार आहे. युजवेंद्र चहलने २ कोटी, ३७ लाख आणि ५५ हजार दिली असून राहीलेली रक्कम घटस्फोट झाल्यानंतर देणार आहे.
https://www.instagram.com/snehzala/?utm_source=ig_embed&ig_rid=f7dd9737-0554-4757-8d34-56bb7a079dc3
युजवेंद्रच्या ‘शुगर डॅडी’ टी-शर्टवर इंटरनेटवर प्रतिक्रिया
युजवेंद्रच्या टी-शर्टवर प्रतिक्रिया देताना, एका नेटकऱ्याने हसणाऱ्या इमोजीसह कमेंटमध्ये लिहिले, “छान टी-शर्ट,” तर दुसऱ्याने लिहिले, “टी-शर्ट जाणूनबुजून घातला होता” कोणीतरी अशीही टिप्पणी केली, “चांगला खेळलेला भाऊ.” चहलने घातलेल्या या टी-शर्टचा तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर अवलंबून राहणे असा अर्थ होत असल्यामुळे त्याच्या टी-शर्टने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.