Samruddhi Mahamarg : १ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर टोलवाढ, किती पैसे भरावे लागणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। समृद्धी महार्गावरून प्रवास करणाऱ्यासांठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र रस्ते वर विकास महामंडळाने १ एप्रिलपासून या महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या टोलचे दर १९ टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत. या दरवाढीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते मुंबई या ७०१ किमीपैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला आहे. तर लवकरच इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किमीचा मार्गही सुरु होणार आहे. मात्र त्यापू्र्वी ‘एमएसआरडीसी’ने टोलच्या दरवाढीची घोषणा केली आहे.

दरम्यान, नव्या दरानुसार आता मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्याऱ्यांना १४४५ रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासा करणाऱ्यांना १२९० रुपये टोल भरावा लागणार आहे. ३१ मार्च २०२८ पर्यंत ही टोलवाढ लागू राहणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्यात आली होती.

वाहनांचा प्रकार सध्याचे दर नवे दर

कार, हलकी मोटार १०८० १२९०

तीन आसांची व्यावसायिक ३९९० ४७५०

अवजड बांधकाम यंत्रसामुग्री ५७४० ६८३०

अति अवजड वाहने ६९८० ८३१५

हलकी, व्यावसायिक, मिनी बस १७४५ २०७५

बस अथवा दोन आसांचा ट्रक ३६५५ ४३५५

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *