महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। सोमवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अक्षर पटेलच्या नेतृ्त्वाखाली दिल्लीच्या टीमने विजय मिळवला. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी नव्या फ्रँचायझीसोबतचा पहिला सामना होता. यावेळी माजी आयपीएल टीमविरुद्ध खेळणारा पंत फलंदाजीमध्ये तसंच विकेटकीपिंगमध्येही फ्लॉप ठरला.
परंतु सामना सुरु असताना पंत नेहमीप्रमाणे मस्तीही करताना दिसला. दरम्यान या हायव्होल्टेज सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा १ विकेटने पराभव केला.
अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा अखेर विजय झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना अतिशय रोमांचक झाला. सामना कोणतंही वळण घेऊ शकत असल्याने दोन्ही टीम्सवर दडपण होतं. दोन्ही डगआऊटमधील वातावरण तणावपूर्ण होतं. मात्र, या सगळ्यादरम्यान भारतीय सहकारी ऋषभ पंत आणि कुलदीप यादव वेगळ्याच मस्तीत दिसले. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ज्यात पंत कुलदीपला धक्का देताना दिसत आहे.
Pant being naughty with Kuldeep🤣🤣 #IPL #DCvLSG pic.twitter.com/uatkYVLfsx
— RocketNitro1992 (@RNitro1992) March 24, 2025
पंतने क्रिझवर दिला कुलदीपला धक्का
रवि बिश्नोई लखनऊकडून 18 वी ओव्हर टाकत होता. कुलदीप यादव या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर बीट झाला. यावेळी हा बॉल विकेटकीपर आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतकडे गेला. त्यावेळी पंतने स्टंपवर बॉल मारण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी तोल जात असतानाही कुलदीपने स्वत:ला क्रीजमध्येच ठेवलं. मात्र यावेळी पंतने गंमतीने त्याला क्रीजमधून बाहेर ढकललं आणि बेल्स उडवून दिल्या. दोघांमधील हा मजेशीर किस्सा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
दिल्लीकडून लखनऊचा विजय
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला. यावेळी अक्षरने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत निकोलस पूरन (७५) आणि मिचेल मार्श (७२) यांनी वादळी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सला २१० रन्सचं आव्हान दिलं. खराब सुरुवातीनंतरही दिल्लीला सामना जिंकण्यात यश आलं.