महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। तुमचं बँकेत काम असेल तर आठवड्यातील पहिल्या 5 दिवसांतच उरकून घ्या…कारण, आता बँक फक्त 5 दिवसच खुली राहणार असल्याचा दावा करण्यात आलाय…तसा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय…त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे…मात्र, ऑफिसला जाणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेतील कामासाठी वेळ काढावा लागणाराय…बरेच जण शनिवारी सुट्टी असल्याने बँकेचं काम आटोपून घेतात…मात्र, आता हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकजण संभ्रमात आहेत…या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात…
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय की, ‘बँका आता फक्त 5 दिवसच खुल्या राहणार. शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेत काम असेल तर सुट्टी घ्यावी लागेल’. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे…जरी ऑनलाईन सेवा उपलब्ध असली तरी अनेकांचं बँकेत काम असतं…त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी केली…याबाबत आरबीआयकडे अधिक माहिती मिळू शकते…त्यामुळे आम्ही पडताळणी केली…त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात…
व्हायरल सत्य काय?
बँक फक्त 5 दिवसच सुरू राहणार ही अफवा
बँक सरकारी सुट्टीनुसारच बंद राहणार
बँकांच्या सुट्टीबाबत RBIच्या नवे नियम आणणार
सोमवार ते शुक्रवार फक्त बँक सुरू ठेवण्याचा विचार
सुट्ट्यांबाबत आरबीआयने नवीन घोषणा केलेली नाही
भविष्यात बँका 5 दिवस सुरू ठेवण्याबाबत विचार होऊ शकतो…मात्र, आमच्या पडताळणी फक्त 5 दिवसच बँका सुरू राहणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.