नंबरप्लेट बदलण्याच्या प्रक्रियेला पुणेकरांचा थंड प्रतिसाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। पुणे शहरात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून फारसा उत्साह दिसत नाही. वाहनांची चोरी व बनावट नंबर प्लेट सुरू करण्यासाठी ही प्रणाली केंद्र सरकारने लागू केली असली तरी पुण्यात अजूनही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पुण्यात एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद असून अद्याप अडीच लाख वाहनधारक या नंबर प्लेटच्या प्रतीक्षेतच असल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही नंबर प्लेट बसविण्यासाठीची मुदत ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार पुणे शहरात या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांच्या केंद्रावर रांगा लागल्या असताना पुणेकरांचा या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला कमी प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. परंतु परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबरप्लेटचे शुल्क सर्वाधिक असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक वाहन चालकांनी या नंबरप्लेटकडे पाठ फिरवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *