पहिल्याच सुनावणीत उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत समोर न आलेला पुरावा मांडला; वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला. बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला. वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात मांडण्यात आल्या आहेत. मात्र, एक गोष्टी चार्जशीटमध्ये नव्हती. ती म्हणजे सीडीआर. हाच सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात मांडला. सीडीआरचा महत्त्वाचा मुद्दा हा आरोपपत्रापेक्षा वेगळा आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याने फरार असताना त्याने विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला तीनवेळा फोन केला होती, अशी माहिती सीडीआरमधून समोर आली आहे. हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. या सीडीआर रिपोर्टमुळे वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी असलेले थेट कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबीयांचे वकीलपत्र न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील न्यायालयासमोर मांडला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची असलेली भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

संतोष देशमुख यांना मारणाऱ्या गँगचा लीडर सुदर्शन घुले आहे का? वाल्मिक कराड याच्या सांगण्यारुन आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आले असून आवाजाची ओळख पटवण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं होतं. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 तारखेला बैठक झाली होती. इथे सगळे आरोपी हजर होते. 8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत, अशी चर्चा त्यावेळी झाली. यावर ‘त्याला कायमचा धडा शिकवा’, असे विष्णू चाटे म्हणाला. या संपूर्ण घटनेला गाईड करण्याचे काम वाल्मिक कराड याने केले, असे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले. दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांच्या प्राथमिक युक्तिवादानंतर आजच्या दिवसाची सुनावणी संपली.

वाल्मिक कराडच्या वकिलांची नवी मागणी
ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यावेळी हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र वाल्मिक कराड याच्या वकिलांनी त्याला विरोध केला. 12 मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि कागदपत्रं मागितली होती. आज सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांककडून पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि चार्जशीट मधील जबाबाची मागणी करण्यात आली. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील केस संदर्भातील डॉक्युमेंट केले न्यायालयापुढे सादर केले. सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.

आरोपीचे वकील विकास खाडे यांनी कोर्टासमोर काय युक्तिवाद केला?
सरकारी वकिलांनी सगळी घटना सांगितली. पण अद्याप आम्हाला आम्ही जी मागणी केलेली माहिती मिळालेली नाही. ही माहिती मिळवणे आमचा अधिकार आहे. सरकारी वकिलांनी घटनेचा संदर्भ सांगत असताना सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती दिली आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. ती आधी आम्हाला द्यावी त्यानंतरच ही केस चार्ज फ्रेम करावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *