पोलिसांसमोर आकाच्या चेल्यांनी सगळं कबूल केलं ; संतोष देशमुखांना आम्हीच संपवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ मार्च ।। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या गँगमधील तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे पोलिसांसमोर कबूल केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांच्या चौकशीत कबुली दिली. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती, त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यासह तेच्या चेल्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आता त्यांनी पोलिसांच्या तपासात संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबूली दिल्याचे समजतेय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं. यामध्ये सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे आरोपी होते. या गँगचा लीडर सुदर्शन घुले यांनी पोलीस कस्टडीमध्ये जबाब दिला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टारमाईंड सुदर्शन घुले याच्यासह जयराम चाटे आणि महेश केदार यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. सुरूवातीला त्याप्रकरणात सहभाग नाकारणाऱ्या घुलेने खाकीने जरब दाखवली. अवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ पोलिसांनी दाखवला अन् खडसावून विचारले. तेव्हा घुले पोपटासारखा बोलू लागला. ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला’, अशी कबुली सुदर्शन घुले याने पोलिसांना दिल्याचे समजतेय. पोलिसांना दिली. सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितला.

संतोष देशमुख याने आवादा कंपनीच्या आवारात आम्हाला बेदम मारहाण केली, आमचा आपमान केला. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. संतोष देशमुख यांनी आम्हाला मारल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आम्हाला आव्हान केले होते. संतोष देशमुख यांच्या या कृतीचा आम्हाला प्रचंड राग आला होता, त्यामुळे आम्ही त्याला मारण्याचा प्लान आखला, असे घुले याने पोलिसांना सांगितले.

येथील आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीमध्ये संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. यावर कायमचा उपाय काढण्यासाठी विष्णू चाटे याच्यासोबत दोन वेळा बैठक केल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ काढल्याची कबुली पोलिसांना दिली. जयराम चाटे यानेही सर्व आरोप मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींनी या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव घेतले की नाही? याबाबत माहिती समजली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *