Video : SRH vs LSG: ट्रेविस हेडच्या दांड्या गूल करणारा प्रिन्स यादव कोण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ मार्च ।। गुरुवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये लखनऊने हैदराबादचा पराभव केला. दरम्यान या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या सामन्यात या वेगवान गोलंदाजाने धोकादायक फलंदाजाची विकेट घेतली.

प्रिन्स यादवने आपला दुसरा आयपीएल सामना खेळला. या वेगवान गोलंदाजाने धोकादायक सनरायझर्स हैदराबाद (SRH) फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे आता हा प्रिन्स यादव नेमका कोण आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

ट्रेविस हेडला केलं बाद
लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेऊन आपलं नाणं खणखणीत वाजवलं. प्रिन्स यादवने ट्रॅव्हिस हेडला ४७ रन्सवर आऊट केलं. सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या आठव्या ओव्हरमध्ये प्रिन्स यादवने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केलं. २३ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेताच, लखनऊ सुपर जायंट्सच्या डगआउटमध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूंनी आनंदाने टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.

कोण आहे प्रिन्स यादव?
प्रिन्स यादव हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये प्रिन्स यादवला ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केलं होतं. २०२४-२५ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रिन्स यादवने दिल्लीसाठी ६ सामन्यात २२ च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर प्रिन्स यादवने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये त्याचा खेळ सुरु ठेवला. प्रिन्स यादव २०२४ च्या सिझनमध्ये ओल्ड दिल्ली ६ फ्रँचायझीसाठी क्रिकेट खेळला. स्वतःच्या एक्शनमध्ये कमी बदल करून वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.

दिल्ली प्रिमीयर लीगमधील कामगिरी
प्रिन्स यादवने २०२४ च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये कहर केला होता. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो पाचवा गोलंदाज होता. ओल्ड दिल्ली ६ कडून खेळताना, प्रिन्स यादवने १० सामन्यात १३ विकेट्स घेतल्या होता. ज्यामध्ये सेंट्रल दिल्ली किंग्ज विरुद्ध त्याने हॅटट्रिकही घेतली होती. प्रिन्स यादवने २०२४-२५ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *