31 March 2025 Deadline: या ५ महत्त्वाच्या बाबींसाठी ३१ मार्च आहे डेडलाईन, चुकलात तर पुन्हा संधी मिळणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ मार्च ।। ३१ मार्च रोजी या आर्थिक वर्षांची सांगता होणारे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतील. काही सरकारी योजना या ३१ मार्च रोजी संपत आहेत. जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर यापूर्वीच तुम्हाला त्यात गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय अपडेटेड आयटीआर, टॅक्स अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ३१ मार्चपूर्वी पूर्ण कराव्या लागणार आहेत. जर तुम्ही या तारखेपूर्वी ही कामं पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला कदाचित पुन्हा संधी मिळणार नाही.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र गुंतवणुकीअंतर्गत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. केवळ महिला किंवा मुलीच या योजनेत गुंतवणूक करू शकतात किंवा त्यांचे पालक त्यांच्यावतीनं या योजनेत पैसे गुंतवू शकतात. या योजनेत किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येते. तर एक महिला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते.

अपडेटेड आयटीआर
अपडेटेड आयटीआर २०२२ च्या अर्थसंकल्पात कलम १३९ (८) अंतर्गत आणलं गेलं. याअंतर्गत सरकारनं करदात्यांना त्यांचे अपडेटेड आयटीआर ठराविक मर्यादेत भरण्याचा पर्याय दिला. करदात्यांनी आयटीआर दाखल केला नसेल किंवा काही अपडेट्स असतील तर त्यांना अपडेटेड आयटीआर भरण्याची संधी देणं हा यामागचा उद्देश आहे. ज्यांना यावर्षी अपडेटेड आयटीआर भरायचा आहे, त्यांच्यासाठी ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे.

टॅक्स बचतीसाठी गुंतवणूक
जर तुम्हालाही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काही गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे ३१ मार्च २०२५ पर्यंतची वेळ आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर भरताना तुम्हाला त्याच गुंतवणुकीचा लाभ मिळेल, जी ३१ मार्च २०२५ पर्यंत असेल. त्यानंतर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली तर त्याचा फायदा तुम्हाला पुढील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच २०२५-२६ च्या आयटीआरमध्ये मिळेल.

पीएम इंटर्नशिप योजना
जर तुम्हीही विद्यार्थी असाल आणि पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्याअंतर्गत नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. यापूर्वी ही मुदत १२ मार्च होती, जी नंतर वाढवण्यात आली.

अल्पबचत योजनांवरील व्याज
जानेवारी ते मार्च या तिमाहीतील अल्पबचत योजनांवरील व्याजाची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर नवे व्याजदर जारी केले जातील. मात्र, व्याजदरात काही बदल होतीलच असं नाही. अनेकदा सरकार व्याजदर स्थिर ठेवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *