राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक ठिकाणी शोभायात्रा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. ३० मार्च ।। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. चैत्र महिन्यातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. या नववर्षाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. शिशिर ऋतूतील पानगळ संपलेली असते, सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचं. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.

यावर्षी राज्यभरात अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य स्वागतयात्रा काढल्या जातात. या शोभायात्रांमध्ये तर तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणूक काढून नववर्षाचे उत्साहाने स्वागत केले जाते. यावेळी सगळेचजण पारंपारिक वेशभूषा करतात. डोंबिवली, गिरगाव, पुणे तसेच अनेक ठिकाणी ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते.

गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुर्हूंतांपैकी एक मानला जातो. या दिवशी मोठी खरेदीही केली जाते. सोने-चांदी खरेदीलाही ग्राहकांची मोठी गर्दी असते. नववर्षाच्या मुहूर्तावर सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन व घर घेण्याकडे देखील नागरिकांचा कल दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *