महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. ३० मार्च ।। वैद्यकीय विमा पॉलिसीअंतर्गत दावेदाराला मिळालेली रक्कम मोटार वाहन कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या भरपाईतून वजा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर, न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या त्रसदस्यीय खंडपीठाने कंपनीच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे.
वैद्यकीय विमा पॉलिसीअंतर्गत दावेदाराला मिळालेली कोणतीही रक्कम मोटार वाहन कायद्याच्या कलम 166 अंतर्गत कार्यवाहीमध्ये ‘वैद्यकीय खर्च’ या शीर्षकाखाली दावेदाराला देय असलेल्या भरपाईच्या रकमेतून वजा करण्यास पात्र नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबईतील मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने अपघातात झालेल्या दुखापतीवरील खर्चापोटी वैद्यकीय खर्च म्हणून डॉली सतीश गांधी यांना भरपाई मंजूर केली होती.