महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल ।। भारतात लवकरच एटीएम बंद होणार असल्याचे चित्र आता दिसत आहे. मागच्या वर्षभरात जवळपास ४ हजार एटीएम बंद झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डिजिटल पेमेंटचा वाढता वापर. डिजिटल पेमेंटमुळे अनेकजण स्वतः जवळ रोख रक्कम ठेवतच नाही. रोख रक्कम ठेवली तरी ती फार कमी असते. त्यामुळे येत्या काळात एटीएम बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डिजिटल क्रांतीमुळे ग्राहकांना वेगानं सुविधा उपलब्ध होत आहेत….मात्र हीच डिजिटल क्रांती आता जुन्या होत चाललेल्या अनेक साधनांच्या अस्तित्वावर उठलीय. सर्वांच्या हातात मोबाईल आले आणि STD, PCOलाच लोक विसरले. आणि हीच वेळ आता एटीएमवर येणार असल्याचं चित्र दिसतंय. कारण प्रत्येक जण आता यूपीआय द्वारे पेमेंट करू लागलंय. १० रुपये भाजीवाल्याला देतानाही ग्राहक क्यूआर कोडचा वापर करू लागले आहेत. आणि त्यामुळे कॅश काढण्यासाठी कुणीही एटीएमकडे फिरकत नसल्याचं चित्र आहे.