पिंपरी विधानसभेचे आमदार मा.श्री.अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा

Spread the love

Loading

पिंपरी विधानसभेचे आमदार मा.श्री.अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा

तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व अशोक अण्णा भडकुंबे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

पिंपरी-चिंचवड

पिंपरी विधानसभेचे आमदार मा.श्री.अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व अशोक अण्णा भडकुंबे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत द फर्न हॉटेल येथे आयोजित केला होता..

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व अशोक अण्णा भडकुंबे यांचा केक कापण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष योगेशजी बहल यांनी आपले विचार व्यक्त करताना आमदार बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अशोक अण्णा भडकुंबे यांना ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभे चे आमदार अण्णासाहेब बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्ष योगेशजी बहल,रायगड महानगरपालिका माजी महापौर जगदीश गायकवाड,मा.नगरसेवक योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या पूनम ताई लोखंडे,रुपाली धाडगे,सामाजिक कार्यकर्ते अजय थोरात,राजू जाधव,अजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा सोहळा खेळीमेळीच्या वातावरनात संपन्न झाला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *