महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल ।। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादातत सापडले आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर सर्वात मोठी कारावाई करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. 2 दिवसांत पैसे भरण्याची सूचना महापालिकेनं दीनानाथ रुग्णालयाला बजावली आहे. 22 कोटी 6 लाख 76 हजार 81 रुपयांची थकबाकी तात्काळ भरण्याचे आदेश पुणे महापालिकेनं नोटीसीतून दिले आहेत. पत्र मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत थकबाकी भरायचे आदेश या नोटीस मध्ये देण्यात आली आहे. थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचे आदेश.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या तनिषा भिसे प्रकरणात आज आणखी दोन अहवाल येणार आहेत…. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचा अहवाल काल आला ज्यात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं.रुग्णाला उपचार देण्यात रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचंही नमूद करण्यात आलंय…आज माता मृत्यू अन्वेषण चौकशी समिती आणि धर्मदाय चौकशी समिती यांचा अहवाल येणं बाकी आहे. आज हे दोन्ही अहवाल येण्याची शक्यता आहे. या तिनही अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. पेशंटसमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. रुग्ण तब्बल साडेपाच तास रुग्णालयात होती. यावेळी रक्तस्त्राव सुरु असतानाही उपचार करण्यात आले नाहीत असं चाकणकरांनी म्हटलंय. याप्रकरणी शासकीय अहवालानंतर आणखी दोन अहवाल येणार आहेत. या तिन्ही अहवालानंतर कारवाई करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचंही चाकणकरांनी नमूद केलंय.