महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० एप्रिल ।। सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने ०.२५ टक्क्यांनी रेपो रेट कमी केला आहे. त्यामुळे आतापासून रेपो रेट ६ टक्के असणार आहे. याआधी रेपो रेट ६.२५ टक्के होता. दरम्यान, रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होणार आहे. रेपो रेटवर कर्जाचे व्याजदर अवलंबून असतात. कर्जाचे व्याजदर कमी झाल्याने ईएमआय कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. रेपो रेट मागच्या तीन महिन्यात कमी झाला होता. त्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केले होते. पुन्हा एकदा रेपो रेट कमी झाल्याने हप्ता कमी येणार आहे. यामुळे कार लोन,होम लोन स्वस्त होणार आहे.