महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र असते. रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्न-धान्य मिळते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत चांगले धान्य मिळावे, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. दरम्यान, आता रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.
रेशन कार्ड केवायसी (Ration Card KYC) करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ होती. मात्र, ही तारीख आता वाढवून ३१ एप्रिल २०२५ करण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी फक्त १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे या १५ दिवसांत तुम्हाला केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होईल.
लाखो नागरिकांनी केले नाही केवायसी
देशभरात लाखो नागरिकांनी रेशन कार्ड केवायसी केलेले नाही. त्यामुळेच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. रेशन कार्ड केवायसी केल्यानंतर त्या कार्डधारकाची ओळख पटते. त्यामुळे रेशन कार्डवरुन होणाऱ्या फसवणूकीला आळा बसणार आहे.
रेशन कार्ड केवायसीची प्रोसेस (Ration Card KYC Process)
तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने केवयासी करु शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने केवायसी करु शकतात.
ऑनलाइन पद्धत (Ration Card KYC Online Process )
तुम्हाला मेरा केवायसी आणि आधार फेस आरडी हा अॅप डाउनलोड करायचा आहे.
यानंतर तुमचे राज्य निवडायचे आहे.
आधार नंबर टाकायला आहे. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.