महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक पर्यटन स्थळांवर जाण्यास निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेळेवर पहाटेपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोर घाटात वाहतूक कोंडी झालीय. सलग सुट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी होते आहे. ही कोंडी टाळण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहने दोन्ही लेन वरून सोडण्यात आली आहेत.