महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष आहे. दरम्यान, आता ८ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. एप्रिल महिना संपण्याआधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.
एप्रिल महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे त्याआधी लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार आहे. ३० एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचे १५०० रुपये मिळणार आहे. येत्या ८ दिवसांत पैसे जमा होणार असल्याने महिलांना आनंद झाला आहे.
लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पडताळणी (Ladki Bahin Yojana Application Verification)
लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सध्या सुरु आहे. आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत जर २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana)महिलांच्या अर्जांची पडताळणी फार पूर्वीपासून सुरु केली आहे. यामध्ये महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत की नाही याची तपासणी केली गेली आहे. यानंतर महिला सरकारी नोकरी करत तर नाही याची तपासणी केली गेली आहे.
महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे की नाही याची घरोघरी जाऊन तपासणी केली गेली आहे. यानंतर आता महिलांच्या पगाराचा तपासणी केली जाणार आहे. जर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.