पहलगाम येथे पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार : पोलिसांची वर्दी परिधान करत केला हल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटलं जात आहे. पहलगाम येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांच्या हातात बंदुका होत्या आणि प्रत्येकाला ते नाव विचारत होते. तसंच, कलमा वाचायला सांगत होते त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दुर्घटनेत 28 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर बसवलंय, असं दहशतवाद्यांनी पर्यटकांना म्हटलं असल्याचा दावा केला जात आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शींनी जे काही सांगितलं ते मन विचलित करणारं आहे. पुण्याची पर्यटक पहलगाम येथे फिरण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, केली होती आणि मास्कदेखील घातले होते. हल्लेखोरांनी फक्त पुरुषांवरच गोळीबार केला आणि हिंदूंना जबरदस्ती कलमा वाचायला लावण्याचा प्रयत्न केला. ज्यांना वाचता आलं नाही त्यांच्यावर गोळ्या चालवल्या.

पुण्याच्या महिला पर्यटकाच्या माहितीनुसार, माझ्या डोळ्यांदेखत माझी वडिल आणि माझ्या काकांवर तीन गोळ्या चालवण्यात आल्या. आम्ही एका टेंटच्या मागे लपलो होतो संधी मिळताच आम्ही घोड्यावर बसून तिथून पळून आलो. दहशतवाद्यांना 26/11 प्रमाणेच हल्ला केला.

पीडितेने पुढे म्हटलं की, दहशतवाद्यांनी आम्हाला मोदींच्या नावाने धमकी दिली आणि म्हटलं की, तुम्ही लोकांनी मोदींना डोक्यावर बसवून ठेवलं आहे. त्यामुळं आमचा धर्म संकटात आहे. घटनास्थळी तेव्हा 50हून अधिक लोक होते. घटनेनंतर लष्कराने बचावकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. काही स्थानिकांनीदेखील मदत केली. त्यामुळं आम्ही सुरक्षितरित्या तिथून निघून येऊ शकलो.

पुण्यातील पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये
पुण्यातील हडपसर परिसरातील पर्यटक देखील जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. हडपसर आणि शिरूर, दौंड तालुक्यातील एकूण 65 रहिवाशी काश्मीर मधल्या श्रीनगर मध्ये अडकून पडले आहेत. आम्हाला पुण्यात घेऊन या पर्यटकांची प्रशासनाकडे मागणी. अडकलेल्या पर्यटकांनी व्हिडिओ काढून पाठवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *