दर महिन्याला देशातील बेरोजगारी कळणार : 15 मेपासून डेटा प्रसिद्ध केला जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। देशात किती बेरोजगार लोकांची संख्या आहे, याची माहिती दर महिन्याला जनतेसमोर येणार आहे. येत्या 15 मे 2025 पासून ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. 15 मे रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या बेरोजगारीच्या डेटामध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा तीन महिन्यांची आकडेवारी असणार आहे. जून महिन्यापासून दर महिन्याची आकडेवारी जाहीर केली जाईल, असे या अधिकाऱयाने सांगितले.

पुढील महिन्यात 15 मेपासून बेरोजगारीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यावर सरकारी पातळीवर एकमत झाले आहे. आतापर्यंत सरकारकडून तिमाहीच्या आधारावर शहरी बेरोजगारीची आकडेवारी आणि ग्रामीण बेरोजगारीची संयुक्त आकडेवारी प्रसिद्ध केली जात होती, परंतु आता तीन महिन्यांऐवजी दर महिन्याला ही आकडेवारी जाहीर केली जाईल. एप्रिलच्या अखेरपर्यंत खासगी कॅम्पसमधील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. तसेच सर्विस सेक्टरमधील वेंचर्सच्या सर्व्हेचे निष्कर्षही जाहीर केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *