Horoscope Today दि. २९ एप्रिल ; आज कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करा…..….…… ; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।।

मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope )
आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in )
मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in )
मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई -घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope )
कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope )
स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *