Pahalgam Attack : ; पहलगाम हल्ल्याच्या तपासात धक्कादाक खुलासे ; २० मृतांची पँट खाली ओढलेली, खतना पाहून गोळीबार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ एप्रिल ।। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने मृतदेहांची अवस्था बघून गंभीर बाबी मांडल्या आहेत. तपास करणाऱ्यांना असं आढळून आलं की, २० मृतांची पँट खाली ओढलेली होती किंवा त्यांची चेन उघडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव, धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय की, दहशतवाद्यांनी पीडितांकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं. कलमा वाचायला सांगितला आणि त्यानंतर पँट काढायला लावून ‘खतना’ तपासले. पर्यटक हिंदू आहेत की नाहीत हे पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना जवळून गोळी मारली.

पीडित कुटुंबियांना हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे कपड्यांकडे लक्ष नसावे. घटनास्थळी गेल्यावर बचावपथकानेही मृतदेह तसेच उचलले होते. फक्त पांढऱ्या कापडाने ते झाकले होते. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये २६ पैकी २५ हिंदू पुरुष होते.

पहलगाम हल्ल्याचा तपास आता वेगाने होते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्राल, पुलवामा, अनंतनाग, कुलगाम यासारख्या परिसरात जवळपास ७० दशतवादी समर्थक आणि ओवरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला १५०० जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी ७० जणांवर दाट संशय आहे. लवकरच दोषींपर्यंत पोहोचू अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *