महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ एप्रिल ।। राज्यात आगामी 48 तास उष्णतेची लाट कायम राहणार असून शुक्रवारी ब्रह्मपुरीचे तापमान 45.9, तर पुणे शहराचा पारा 43.2 अंशांवर गेला होता. दरम्यान, राज्यातील काही भागांत दोन दिवसांत हलक्या पावसाचाही अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात गेले 25 दिवस तापमानाचा पार उंचावल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. संपूर्ण मार्च आणि एप्रिलमध्येही सरासरी पाऊसही झाला नाही. त्यामुळे उष्णलहरी अधिकच तीव्र होत आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा दिवसेंदिवस असह्य होत आहे. विदर्भासह यंदा मध्य महाराष्ट्रात अतिशय कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार होत आहेत. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
शुक्रवारचे तापमान : ब्रह्मपुरी 45.9, अकोला 45.2, चंद्रपूर 45, पुणे (लोहगाव 43.2, शिवाजीनगर 40.5), जळगाव 43.2, कोल्हापूर 34.3, महाबळेश्वर 32.6, मालेगाव 43, नाशिक 38.3, सांगली 35.8, सातारा 40.3, सोलापूर 42.3, धाराशिव 42, छ. संभाजीनगर 41.4, परभणी 43.4, बीड 43.1, अमरावती 44.2, बुलडाणा 40.6, नागपूर 44.4, मुंबई (कुलाबा) 34.3.