मोबाईल घ्यायचा आहे ?तब्बल 6000mAh क्षमतेच्या Realme C12 हा फोन आज (दि.24) खरेदी करण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ ऑगस्ट -स्मार्टफोन कंपनी रिअलमीने काही दिवसांपूर्वीच भारतात आपले दोन नवीन बजेट स्मार्टफोन Realme C15 आणि C12 लाँच केले आहेत. त्यातील Realme C12 हा फोन आज (दि.24) खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीकडून या फोनची पहिल्यांदाच विक्री केली जाणार आहे. दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर (Realme.com) फ्लॅश-सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. 8,999 रुपये इतकी या फोनची किंमत आहे. रिअलमी सी12 मध्ये कंपनीने तब्बल 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट आणि फिंगरप्रिंट सपोर्ट यांसारखे फीचरही या फोनमध्ये आहेत.

ऑफर्स :-
Realme C12 हा फोन कंपनीने 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलमध्ये फोनवर काही आकर्षक ऑफरही आहेत. हा फोन फेडरल बँकेच्या डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’वर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक व ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही 5 टक्के सवलत मिळेल. सेलमध्ये पार्टनर ऑफरअंतर्गत एक्स्चेंजमध्ये हा फोन खरेदी केल्यास 6 महिने गुगल वन ट्रायल फ्री मिळेल. तसेच दरमहा एक हजार रुपये नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचे पर्यायही आहेत.

Realme C12: स्पेसिफिकेशन्स-
रिअलमी सी12 हा फोन अँड्रॉइड 10 आधारित रिअलमी यूआयवर कार्यरत असून यामध्ये 6.5 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर या फोनमध्ये असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्याय आहे. फोटोग्राफीसाठी रिअलमी सी12 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (13MP + 2MP + 2MP) आहे. तर, सेल्फीसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. 10 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली तब्बल 6,000 एमएएच क्षमतेची बॅटरी यामध्ये आहे. शिवाय कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, माइक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. Realme C12 च्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर देण्यात आलं आहे. 8,999 रुपये इतकी Realme C12 ची किंमत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *