![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल ।। पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करावा यासाठी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आदेश दिले आहेत. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने हे आदेश जारी केले आहेत. दंडात्मक कारवाईनंतर हे पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास थेट नळ तोडण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांना चांगली चपराक बसणार आहे.
पुणे शहरातील अनेक सोसायटी यांना स्वयंचलित पाण्याचे कॉक नाहीत परिणामी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी ओवर फ्लो होतं. अनेक बैठकरांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी बाग, वाहने धुणे, रस्त्यावर पाणी मारणे अशा गोष्टींमुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुणे महानगर पालिकेकडून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता दंडात्मक कारवाईसोबत नळ तोडण्याची देखील कारवाई होणार आहे.
पुणेकरांनो पाणी जपून वापरा कारण जर तुम्ही पाण्याचा अपव्यय कराल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल असा आदेश पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पुणे शहरासह राज्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. एका बाजूला राज्यातील पाणीटंचाई पाहता पुढे नगरपालिकेने हा योग्य निर्णय घेतला असावा असं तज्ज्ञांचे मत आहे.
पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. दंडात्मक कारवाई करूनही पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास पाणी पुरवठा विभाग नळसुद्धा तोडू शकतात. पुणे शहरातील खराडी, चंदन नगर लोहगाव, धानोरी स्वागत मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजही अनेक जण मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करतात. हेच टाळण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.

