Ladki Bahin Yojana: ७२ तासांत लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार ! खात्यात ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल ।। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या ७२ तासांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. (Ladki Bahin Yojana April Month Installment)

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याच्या अखेरपपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली होती. आता एप्रिल महिना संपायला फक्त ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या ७२ तासांत कधीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना आनंद झाला आहे.

या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये
लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्या योजनांमध्ये महिलांना १५०० पेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरीत रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. त्यामुळे उरलेले ५०० रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत.

या महिलांना मिळणार नाहीत पैसे
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. या महिलांना एकही रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहेत. त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *