Pakistani Channels Ban: आता भारतात दिसणार नाहीत हे १६ पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल ।। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सना ब्लॉक केले आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १६ यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत.

गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटे आणि दिशाभूल करणारे कथन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *