आता व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून कॉलिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे युजर्संना आता थेट वेबवरून कॉलिंग करण्याची सुविधा मिळणार आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅपने वेबवर केवळ चॅटिंग करण्याची सुविधा दिली होती, परंतु आता या नव्या फीचरमुळे युजर्स थेट कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. यासाठी युजर्संना व्हॉटसअ‍ॅपच्या विंडोज किंवा मॅक अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल, परंतु सर्व कॉलिंग फीचर्स व्हॉट्सअ‍ॅप वेबवरसुद्धा उपलब्ध असतील, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब क्लायंटच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये या फीचरची टेस्टिंग सध्या केली जात आहे. येत्या काही आठवड्यांत सर्व युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे फीचर सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जे युजर्स ऑफिसच्या कामासाठी दररोज ब्राऊझर्सवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, त्यांना आता मोबाईलवरून व्हाईस कॉल किंवा व्हिडीओ कॉल करण्याची गरज नाही. ते थेट लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून कॉल करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *