महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मे ।। लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवीन अपडेट येत असतात. लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना मे महिन्यात फक्त ५०० रुपये मिळणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.
या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु काही महिलांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत. इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच जर इतर योजनांमध्ये १५०० रुपयांपेक्षा कमी निधी मिळत असेल तर उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाते.
ज्या महिला नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा लाभ घेतात त्यांना ५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात.त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यंदाही तेव्हाच पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.