महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे ।। इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. त्याआधी सर्वांनी आयटीआर फाइल करायला हवे. जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही आयटीआर भरताना विशेष काळजी घ्यायची आहे. आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआर फाइल करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
योग्य फॉर्म निवडणे (Choose Right ITR Form)
आयटीआर फाइल करताना तुम्हाला योग्य फॉर्म निवडणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या उत्पन्नाच्या वयोगटासाठी वेगवेगळे फॉर्म आहेत. १ते ४ फॉर्म हे लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आहे. या फॉर्मबाबत आयकर विभागाने आधीच माहिती दिली आहे. फॉर्म नंबर १७ हा ट्रस्ट आणि चॅरिटेबर इन्स्टिट्यूशंससाठी आहे. याबाबत आयकर विभागाने ११ मे रोजी माहिती दिली. त्यामुळे तुम्ही कोणत्या श्रेणीत येता त्यानुसार फॉर्मची निवड करा.
काही फॉर्ममध्ये बदल (Changes In ITR Form)
आयकर विभागाने यावेळी आयटीआर १ आणि आयटीआर ४ मध्ये मोठा बदल केला आहे. आता जे सॅलरीड कर्मचारी आणि असे करदाते जे प्रिजम्टिव्ह टॅक्सेशन स्कीमअंतर्गत येतात. त्यांना लाँग टर्म गेन १.२५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर आयटीआर १ आणि आयटीआर ४ चा वापर करु शकतात.
ITR Filling
EPFO: कंपनी खरंच तुमच्या PF अकाउंटमध्ये पैसे जमा करते का? एक मिस्ड कॉल द्या अन् करा चेक
जुनी की नवी करप्रणाली (Choose Old Or New Tax Regime)
आयकर विभागाने कर्मचाऱ्यांना जुनी किंवा नवीन करप्रणाली निवडण्याचा ऑप्शन दिला आहे. तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला कोणती करप्रणाली फायद्याची हे पाहून तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात. सध्या नवीन करप्रणालीत १२.७५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ आहे.