11th Admission: विध्यार्थ्यांसाठी बातमी ! अकरावीच्या प्रवेशासाठी लागणार ६ कागदपत्रे, वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे ।। काल दहावीचा निकाल लागला आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया कशी असणार, विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज निवडता येणार, किती कॉलेज टाकता येणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात निर्माण झाले आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. (11th FYJC Admission)

अकरावीच्या अॅडमिशनसाठी १० कॉलेज निवडता येणार (fyjc college selection form)
अकरावीसाठी प्रवेश घेताना तुम्हाला १० कॉलेजची निवड करता येणार आहे. तुम्हाला तुमच्या प्राधान्यानुसार आता कॉलेज टाकावे लागणार आहे. यासाठी फॉर्म लवकरच सुरु होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीक्रमानुसार कॉलेज टाकायचे आहे. यानंतर मेरिट लिस्ट लागणार, यामध्ये तुम्ही ज्या कॉलेजसाठी पात्र आहात, कॉलेजच्या कट ऑफनुसार तुमचा नंबर लागणार.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायची संधी मिळणार आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या शाखेनुसार कॉलेज निवडायचे आहेत.११ मेपासून ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

अॅडमिशनसाठी ही कागदपत्रे आवश्यक (11th FYJC Admission Documents)

गुणपत्रिका

शाळा सोडल्याचा दाखला

आधारकार्ड

पासपोर्ट साइज फोटो

जातीचा दाखला

दुर्बल घटकातून अर्ज करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला

अकरावी प्रवेशासाठी दोन फॉर्म (11th FYJC Admission 2 Forms Filling)

ऑनलाइन प्रवेशासाठी तुम्हाला दोन फॉर्म भरावे लागणार आहेत. दुसऱ्या फॉर्ममध्ये तुम्हाला कॉलेजची नावे टाकावी लागणार आहे.

खुल्या प्रवर्गासाठी ५५ टक्के तर आरक्षणातून ४५ टक्के प्रवेश मिळणार आहे.

प्रवेशासाठी तीन मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. त्यानंतर गरजेनुसार स्पेशल मेरिट लिस्ट जारी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *