महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे ।। लाडकी बहीण योजनेबाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत करु असं आश्वासन देऊन सायबर गुन्हा आणि मनी लाँड्रिंगचे पैसे त्या खात्यात जमा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनेक लोकांच्या नावावर खाती उघडल्याचा आरोप आहे. याबाबत एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, या खात्यांद्वारे कोट्यवधींचे व्यव्हार झाले आहे. यात सायबर फ्रॉड, ब्लॅक मनी असे पैसे या खात्यात जमा केले जात होते.याप्रकरणी आका पोलिस शोध घेत आहेत.
तपासात धक्कादायक माहिती उघड
पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपी हे गरीब प्रवर्गातील निष्पाप लोकांना आमिष दाखवायचे आणि त्यांची बँक खाती सायबर गुन्हेगारांना विकायचे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासात २५०० बँक खाती उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील काही खाती साबर गुन्हेगारांना आणि मनी लाँड्रिंग करणाऱ्यांना विकण्यात आली आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी गुजरातमधील सुरत शहरातून रॅकेट चालवत होते.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार,याप्रकरणी १०० हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे. यात खात्यातून १९,४३,७७९ रुपये जप्त केले.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी बळी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक पुरुष आहेत.यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ही योजना फक्त महिलांसाठीच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील एका कामगाराने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर ही सर्व माहिती उघडकीस आली.