Pune Crime News: गुन्हेगाराला सांगली कारागृहात नेताना मटण पार्टी ; एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे ।। पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेताना थेट महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड गजा मारणे पोलीस संरक्षणात असताना त्याचासोबत मटण पार्टी केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच चार पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोथरुडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसांनी त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्याचा निर्णय घेतला. पोलीस संरक्षणात त्याला सांगलीला नेत असताना ‘कनसे ढाब्या’वर पोलिसांनी मटण पार्टी केली होती. याचा कानोसा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही चेक केले. त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. सोबतच गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरूज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाने, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल धुमाळ खुनाचा गुन्हा तर पांड्या मोहिते हा गजा मारणेच्या टोळीतील शूटर आहे.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
या घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने गुन्हे शाखेतील संबंधितांना फैलावर घेतलं. कणसे धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी केली. यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे.

गजा मारणेला भेटण्यासाठी आलेल्या साथीदारांवरही गुन्हा दाखल
गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाकडे घेऊन जात असताना दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिलं. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *