महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मे ।। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जळगाव शहरातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या २४ तासांत प्रति तोळा सोनं तब्बल १,५०० रूपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर ९४,८०० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात लग्नाचा सिझन सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर १ लाखांवर पोहोचला होता. यामुळे सराफांच्या दुकानात शुकशुकाट होता. पण आता सोन्याचे दर घसरत असल्यामुळे ग्राहक दागिने खरेदीसाठी सराफांच्या दुकानात गर्दी करत आहेत.
अलिकडेच सोन्याचा दर १ लाखांवर गेला होता. उच्चांक गाठल्यामुळे ग्राहकांनीही सराफाच्या दुकानाकडे पाठ फिरवली होती. मात्र, त्यानंतर सलग काही दिवस सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. ही घसरण ‘गोल्ड इज न्यू करन्सी’ टॅरिफ अंमलबजावणीमुळे झाली असावी, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (जीएसटीसह) ९४,८०० रूपये इतका आहे. तब्बल १,५०० रूपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सराफात बाजारात सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २१३० रूपयांनी घसरला आहे. तर, १०० ग्रॅम सोन्याचा दर २१,३०० रूपयांनी घसरला आहे. म्हणजेच १० ग्रॅम तोळ्यासाठी आपल्याला ९४,०८० रूपये मोजावे लागतील.