महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मे ।। महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणिकीच्या पार्श्वभूमिवर 80 नगरसेवकांनी पक्ष बदलला आहे. शिवसेना आणि भाजप पक्षात मोठ्या संख्याने इनकमिंग सुरु आहे. पक्ष सोडणारे सर्वाधिक नगरसवेक हे शिवसेना ठाकरे पक्षाचे आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. या पक्षातील 36 माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना पक्षात आणि भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत.
विकासकामे, निधी आणि राजकीय महत्त्व, सत्तेचा थेट लाभ, राजकीय अस्तित्वासाठी माजी नगरसेवक सत्ताधारी भाजप आणि हिंदि गटात प्रवेश करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निवडणूका घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आगामी काळात पक्षप्रवेश अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचे माजी नगरसेवकांना बाटू लागले आहे. सत्ताधान्यांशी संबंधित राहिल्यास पक्षातील महत्वाचे पद, मागेपुढे निवडणुकीत तिकीट मिळू शकेल, विकासकामांसाठी निधी आणि राजकीय महत्त्व वाढेल, सत्तेचा थेट लाभ मिळेल, असे माजी नगरसेवकांना वाटत आहे.
विरोधी पक्षाच्या माजी नगरसेवकांची कामे ठप्प आहेत. त्यांना प्रभागात काम करता येत नाही, निधी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर यादेखील भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.
आतापर्यंत विविध पक्षांच्या सुमारे 80 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या पक्षात तर काही भाजपमध्ये दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले. विधानसभेत महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे मुंबईत बहुसंख्य नगरसेवकांचा भाजपकडे जाण्याचा ओढा आहे. जे भेट भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत, ते शिदि गटाकडे जात आहेत, असे राजकीय विश्लेषक म्हणाले.