महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। महाराष्ट्रातील कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस अजुन पुढील पाच ते सहा ते दिवस सुरूच राहणार आहे. दरम्यान राज्यात सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनची प्रगती पोषक वातावरणामुळे सुरूच आहे. मात्र यामुळे राज्यात अवकाळीचा जोर सुरूच आहे. सध्या गुजरात आणि दक्षिण गुजरातच्या भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे.
उत्तर कर्नाटक भागात चक्रीय स्थिती, पश्चिम बंगालचा उपसागर, सब हिमालयीन भाग, सिक्कीम, मध्यप्रदेश पार करून छत्तीसगडपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती सक्रीय आहे. उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर देखील चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्वच भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना यामुळे अवकाळी पावसाचा जोर पुढील पाच दिवस राहणार आहे.