महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। बॉलिवूड-अंडरवर्ल्ड संघर्ष आता काही नवीन राहिला नाहीये. गेल्या अनेक दशकांपासून याबद्दल बोललं जातंय. एक काळ असा होता की, बॉलिवूड कलाकारांचे थेट संबंध अंडरवर्ल्डसोबत असायचे. अनेकांनी ते स्वीकारलं, कर काहींनी ते नेहमीच नाकारलं. बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा यायचा,यावरही अनेकदा चर्चा झाल्या. आता ९० च्या दशकातल्याच एक लोकप्रिय अभिनेत्रीनं मोठा खुलासा केलाय.
९० च्या दशकात ‘आशिकी’ सिनेमामुळं स्टार झालेल्या अनु अग्रवालनं एक मोठा खुलासा केला आहे. त्यावेळच्या बॉलिवूड आणि गुन्हेगारी जगतातील संबंधांवर तिनं भाष्य केलंय. त्या काळात चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्डचा खूप हस्तक्षेप होता, असं ती म्हणाली. त्या काळात चित्रपटांचा व्यवसाय कसा चालत होता, याबद्दल तिनं अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.