महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। विदर्भासाठी पुढचे ५ ते ७ दिवस खूपच महत्वाचे असणार आहे. विदर्भाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपून काढणार आहे. हमानतज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी ही माहिती दिली. विदर्भात येत्या ५ ते 7७ दिवस काही भागात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस असाच कायम असणार आहे.
तापमान सामान्य म्हणजे ४० अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. बंगाल आणि अरेबियन समुद्रातून येणारे वारे पाहता यंदा तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंश कमी आहे. ढगाळ वातावरण असल्यानं तसेच बंगाल आणि अरेबियन भागातून येणारे वारे हे आद्रता आहे. यामुळे उकाड्याचा त्रास होत आहे.
मे महिन्यात कुठल्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. पहिल्यांदा मे महिना उष्णता नसणारा महिना ठरणार आहे. विदर्भ नेहमी कडकडत्या उन्हाचा आणि जास्त तापमानाचा समजला जातो. मात्र उत्तरेकडून येणारी हवा त्यामुळे मे महिना यावर्षी विना उष्णतेची लाट घेऊन येणारा ठरला आहे. मे महिन्यातील २० दिवस गेले त्यामध्ये तापमान सामान्य आणि अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर पाहायला मिळाला. त्यामुळे अधून मधून वातावरणात अचानक बदल होऊन पाऊस तर कधी ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता.
तर विदर्भात पुढील १० दिवससुद्धा कमी तापमान आणि अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. विदर्भवासीयांना यावर्षी मे महिन्यात तापमानापासून एकप्रकारे दिलासा मिळला असला तरी उकाड्याने मात्र हैराण करून सोडलं आहे. तेच तापमान ४९ अंशाच्या घरात कायम आहे.
विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून व्यापलेला असतो. पुढील तीन ते चार दिवसात केरळमध्ये जर मान्सून दाखल झाला तरी विदर्भात काय परिस्थिती असेल पाहावे लागणार आहे. विदर्भाला फेवरेबल कंडीशन आहे का? त्यानंतरच मान्सून संदर्भात काही स्पष्ट करता येईल अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली.