Ration Card: या रेशन कार्डधारकांना मोफत धान्यासोबत मिळणार १००० रुपये; काय आहे नवी योजना?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे ।। रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्डधारकांना आता मोफत रेशनसोबतच महिन्याला १००० रुपयेदेखील मिळणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेत मोफत धान्यासोबतच आर्थिक मदतदेखील मिळणार आहे.

ज्या नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट
गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी, हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना १००० रुपये मिळतात.

योजनेच्या अटी
मिडिया रिपोर्टनुसार, ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे याचसोबत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड केवायसी असणे गरजेचे आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षादेखील दिली जाईल. याचसोबत अकाउंटमध्ये दर महिन्याला १००० रुपये पाठवले जातील. यमुळे योजनेत पारदर्शकता राहिल.

अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा दाखल आणि निवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटवर भेट द्यायची आहे. त्यानंतर योजनेच्या अर्जावर क्लिक करा. रेशन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. याचसोबत केवायसी करणे अनिवार्य आहे. ही योजने १ जून २०२५ पासून सुरु होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *