महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २६ ऑगस्ट – पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८८.३९ रुपये असून डिझेलचा दर ८०.११ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे.
जागतिक बाजारात मागील महिनाभर कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने तेल आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी मागील सहा दिवस पेट्रोल दरात वाढ केली होती. तर जवळपास तीन आठवडे डिझेलची किंमत स्थिर आहे.
मुंबईत आजचा पेट्रोलचा भाव ८८.३९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लीटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.७३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.२४ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.