Pune Rain: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३ बळी ; २ हजार हेक्टर शेतीचे नुकसान; आजही अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। पुणे शहरासह जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने तिघांचा जीव घेतला. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडतोय. या पावसामुळे मोठे नुकसान झालंय. पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. पुणे शहरात एकाचा तर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला.

दौंडमध्ये घराची भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील कर्वेनगर भागात झाड कोसळून एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. आजही पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पावसात नागरिकांनी काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी थांबू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे जिल्ह्यात पावसामुळे घरांसोबत शेतीचे देखील मोठं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यात पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना फटका बसला. कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला पावसामुळे वाहून गेला. काढणीला आलेला कांदा आणि बाजरीलाही फटका बसला.

मे महिन्यात जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाकडून देण्यात आला होता. कृषी आणि महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पावसामुळे ५९७ गावांतील ७१४६ शेतकऱ्यांचे सुमारे २४१८.५४ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. जिरायत २५१.०८ हेक्टर, बागायत १८८४.७२ हेक्टर, तर फळपिकांचे सुमारे २०८२.७४ क्षेत्रांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

पुणे शहरात सोमवारी पावसाची संतधार पाहायला मिळाली. जिल्ह्यात पावसाचा जोर अंशतः ओसरला मात्र शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. पुण्याला काल ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे शहरातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसल्या. पुणे शहरात आज ही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. सोमवारी कुठेकुठे किती पाऊस पडला याची आकडेवारी हवामान विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

पुण्यात कुठे किती पाऊस?

वडगावशेरी – ४२.० मिमी

दुधूळगाव – ३८.५ मिमी

पाषाण – ३७.५ मिमी

तळेगाव – ३२.५ मिमी

निमगिरी – ३०.० मिमी

धामधरे – २९.५ मिमी

माळीन – २९.० मिमी

राजगुरुनगर – २६.५ मिमी

नारायणगाव – २३.५ मिमी

चिंचवड – २३.५ मिमी

हवेली – १९.५ मिमी

गिरीवन – १६.० मिमी

मगरपट्टा – १४.५ मिमी

हडपसर – १४.० मिमी

बारामती – ११.० मिमी

दापोडी – ८.५ मिमी

लवासा – ७.५ मिमी

भोर – ७.५ मिमी

लोणावळा – ६.० मिमी

कोरेगाव पार्क – ४.० मिमी

दौंड – ३.५ मिमी

पुरंदर – ०.५ मिमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *