महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। केंद्राने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात किंवा त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. या योजनांमधून आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी खास योजना राबवली आहे. त्यांच्यासाठी खास पीएम स्वनिधी योजना राबवली आहे.
पीएम स्वनिधी योजना आहे तरी काय? (PM Svanidhi Yojana)
पीएम स्वनिधी योजनेत सरकार ८०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज देते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही गॅरंटीशिवाय तुम्हाला हे लोन मिळते. या योजनेत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी मदत केली जाते.
पीएम स्वनिधी योजना ही कोरोना काळत सुरु झाली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट तारण ठेवण्याची गरज नाही. या योजनेस सुरुवातीला १०,००० रुपये दिले जातात. त्यानंतर २०,००० रुपये अन् त्यानंतर ५०,००० रुपये दिले जातात.
पीएम स्वनिधी योजना ही भाजीविक्रेते, फळविक्रेते, रस्त्यावरील स्ट्रीट वेंडरसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे.
या योजनेत ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जाणार आहेत. यातील पहिला हप्ता घेतल्यानंतर तो १ वर्षाच्या आत परत करायचा आहे. जर तुम्ही पहिला हप्ता परत दिला तरच तुम्हाला तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज मंजूर झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.