महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जून ।।
मेष – आर्थिक क्षेत्रात वेगळे धाडस करायला आज हरकत नाही. पैसा वाढेल. उत्साह, उमेद अबाधित राहण्याचा आजचा दिवस आहे.
वृषभ – एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येईल. काही वेळेला कामाचा ताण आणि दगदग यामुळे वाकून जाल. पण झुकून जाऊ नका. हे लक्षात ठेवा.
मिथुन – आरोग्य चांगले राहणार आहे. ठरलेले निर्णय योग्य होतील. कुटुंबीयांचे सहकार्याने पुढे जाल. आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क – आज दिवस थोडा वेगळा आहे. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळणार आहे. भागीदारी व्यवसायामध्ये सुयश मिळेल. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणार आहात.
सिंह – महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करा. आपल्या वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्या. दिवस थोडासा धावपळीचा असेल. संमिश्र फल आहे.
कन्या – काळजी नसावी. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. आपले मनोबल उत्तम राहील. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. दिवस शुभ आहे.
तूळ – शासकीय कामे शक्यतो आज नकोतच. पुढे ढकललेली बरे राहील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. कामामध्ये धावपळ वाढेल.
वृश्चिक – मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लागण्याचा आजचा दिवस आहे. कुलस्वामिनीची उपासना फलदायी ठरेल. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल.
धनु – वाहने आज जपून चालवावी असा सल्ला आहे. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. प्रवासात अडी-अडचणी उदभवतील दिवस राहील.
मकर – व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या संधी आहेत. नवीन दिशा नवे मार्ग सापडतील. योग्य दिशेने वाटचाल कराल.
कुंभ -तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढेल. श्रेयस आणि प्रेयस यामधील श्रेयस गोष्टींना प्राधान्य देऊन पुढे जा.
मीन – महत्त्वाची कामे दुपार पूर्वी करून घ्या. गृहसौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आध्यात्मिक प्रगती होईल. दत्तगुरूंची उपासना फायदेशीर ठरेल.