महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जून ।। राज्यात मागील काही दिवस मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता उसंत घेतली आहे. पुढील तीन दिवस राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही असाअंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र विदर्भातील काही भागांत आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात 10 जून पर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरी उत्तर भारतात तयार झालेल्या पश्चिमी चक्रवातामुळे 4 ते 6 जून या तीन दिवसांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. देशातील बहुतांश भागात 4 ते 7 जून रोजी पाऊस राहणार आहे.8 जून पासून देशाच्या सर्वच भागातून पाऊस कमी होणार आहे.10 ते 12 जून पासून पुन्हा मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.त्याचा जोर 15 जून पासून वाढण्या शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळसह, महाराष्ट्रात सर्वसाधारण वेळेआधी धडक दिली. मात्र अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने जवळपास आठवडाभरापासून मान्सूनची चाल थांबली आहे. त्यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली असून राज्यात काही ठिकाणी तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. 15 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.