महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जून ।। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा केला जाईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलं आहे. जसा एप्रिल महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होता. तसाच मे महिन्याचा हप्तादेखील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, असं त्यांनी म्हटलं. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता महिला मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, त्यानंतर जून महिन्याचा हप्तादेखील कधी जमा होणार, असा प्रश्न महिला विचारत आहेत.